शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना जशास तसे उत्तर, राऊत-कदम यांची टीका

कंबाटा प्रकरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आली आहे. कंबाटा प्रकरणाच्या शिवसेनेवरील आरोपावरून विनायक राऊत आक्रमक झालेत. तर  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 16, 2017, 01:46 PM IST
शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना जशास तसे उत्तर, राऊत-कदम यांची टीका title=

रत्नागिरी : कंबाटा प्रकरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आली आहे. कंबाटा प्रकरणाच्या शिवसेनेवरील आरोपावरून विनायक राऊत आक्रमक झालेत. तर  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 

शिवसेना बुडणारी बँक नाही तर भाजप बुडणारं जहाज आहे, असा पलटवार रामदास कदम यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रचारसभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे बुडणाऱ्या बँका आहेत. त्यांना मतदान केले तर तुमचे पैसे बुडतील, अशी टीका केली होती. त्यावर कदम यांनी प्रत्युत्तर दिले. 

तर रत्नागिरीत खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यावर टीकेची झोड उठवली. अंजली दमानियांचा बोलवता धनी मुख्यमंत्रीच आहे, असा थेट आरोप केला. अज्ञानी व माहिती न घेता बोलणारा पहिला मुख्यमंत्री, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.कंबाटाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. यात 

जर निष्कर्ष काही आढळलं नाही तर मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या बुडाखाली काय जळतं ते पाहावे, असे म्हणालेत. नागपूर महापालिकेचा रस्ता घोटाळाच जबाबदार तेच आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.