रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच रायगडावर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. 

Updated: Jun 6, 2016, 01:15 PM IST
रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह title=

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कालपासूनच रायगडावर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. शिवभक्तांनी ही यासाठी रायगडावर गर्दी केली आहे. विविध संस्थांचे कार्यकर्तेही या शिवभक्तांच्या दिमतीला इथे हजर आहेत. थोड्या वेळातच शाहिरी मुज-यांचा कार्यक्रम होणार आहे. 

दहा वाजता युवराज छत्रपती संभाजी महाराज आणि मुख्यमंत्र्यांचं गडावर आगमन होईल. यावेळी पारंरपरिक वाद्यांचा गजर केला जाणार आहे. त्यानंतर मेघडंबरीतल्या सिंहासनाधिष्ठीत महाराजांच्या मूर्तीला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. या महत्त्वाच्या सोहळ्यासोबतच दिवसभर विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत.