औरंगाबादमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित - सूत्र

औरंगाबादमधील युतीच्या सत्तास्थापनेचा तिढा सूटल्याचं कळतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद असा फॉर्म्यूला निश्चित झाल्याचं कळतंय. 

Updated: Apr 25, 2015, 04:52 PM IST
औरंगाबादमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित - सूत्र title=

औरंगाबाद: औरंगाबादमधील युतीच्या सत्तास्थापनेचा तिढा सूटल्याचं कळतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद असा फॉर्म्यूला निश्चित झाल्याचं कळतंय. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती काठावर पास झालीय. बहुमताचा आकडा ५७  असताना युतीनं ५१ जागा मिळवल्या. त्यात शिवसेनेनं भाजपपेक्षा काही जागा जास्तच मिळवल्या. तर भाजपनं यंदा २२ जागा जिंकत २०१०च्या तुलनेत मोठी आघाडी घेतली. आणि त्याच जोरावर भाजपनं महापौरपदावर दावा केलाय. 

आता महापौरापदासाठी शिवसेनेकडून त्र्यंबक तुपे यांचं नाव आघाडीवर आहे. पहिले अडीच वर्ष शिवसेनेचा आणि नंतर अडीच वर्ष भाजपचा महापौर औरंगाबाद महापालिकेवर असेल. 

दरम्यान, आज शिवसेनेचे सर्व विजयी नगरसेवक मुंबईत मातोश्रीवर येणार आहेत. उद्धव ठाकरेंची सर्व विजयी नगरसेवक भेट घेतील. शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात मुंबईत महापौरपदासंबंधी बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.