निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक

रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

Updated: Nov 27, 2016, 07:12 PM IST
निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक  title=

खेड : रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. निवडणुकांचे निकाल उद्या लागणार असले तरी खेडमध्ये शिवसेनेनं विजयी मिरवणूक काढली आहे.

शिवसैनिकांनी फक्त विजयी मिरवणूकच काढली नाही तर रस्त्यावर फटाके वाजवूनही सेलिब्रेशन केलं. शिवसेनेनं निकालाआधीच काढलेल्या या मिरवणुकीमुळे खळबळ माजली आहे.