तिकीट वाटपात घराणेशाही; खऱ्या रणरागिणींचं काय?

औरंगाबादेत आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

Updated: Apr 8, 2015, 04:33 PM IST
तिकीट वाटपात घराणेशाही; खऱ्या रणरागिणींचं काय? title=

औरंगाबाद : औरंगाबादेत आज शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

प्रचार कार्यालयात येवून त्यांनी महापालिकेच्या तिकीट वाटप प्रक्रियेविरोधात जोरदार आवाज उठवला. महिलांना फक्त आंदोलनासाठी वापरून घेतलं जातं मात्र तिकीट वाटपात घराणेशाही केली जाते, असा आरोप त्यांनी केलाय. 

ज्या महिलांना तिकीट दिले आहेत... त्या कुणा नेत्याच्या पत्नी आहेत, तर कुणाच्या नातेवाईक... मात्र, ज्या महिला शिवसेनेच्या रणरागिनी म्हणून रस्त्यावर उतरतात त्यांना तिकीट वाटपात डावलल्याची भावना या महिलांनी व्यक्त केलीय. 

यावेळी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते महिलांना समजावत आहेत की दरडावताय? असाच काहीसा त्यांचा अविर्भाव पाहायला मिळाला. अंबादास दानवेंच्या समजावणीचा संतप्त रणरागिणींवर काहीही परिणाम झाला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.