शीख धर्मियांचा दिवाळ सणावर बहिष्कार!

देशातील वाढत्या धार्मिक वादंगात आता आणखी एका वादाची भर पडलीय. यंदा शीख धर्मातील कुणीही दिवाळी साजरी न करण्याचा हुकूमनामाच जाहीर करण्यात आलाय. 

Updated: Nov 3, 2015, 04:14 PM IST
शीख धर्मियांचा दिवाळ सणावर बहिष्कार! title=

नांदेड : देशातील वाढत्या धार्मिक वादंगात आता आणखी एका वादाची भर पडलीय. यंदा शीख धर्मातील कुणीही दिवाळी साजरी न करण्याचा हुकूमनामाच जाहीर करण्यात आलाय. 

नांदेडमधील हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारानं हा हुकूमनामा जाहीर केलाय. पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या गुरु ग्रंथ साहिब अवमान घटनेचा निषेध म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. 

यंदा गुरुद्वारात दीपमाळा, रोषणाई, आतिषबाजी केली जाणार नाही तसंच तख्तस्नान, गुरुता गद्दी इत्यादी कार्यक्रमही साध्या पद्धतीनंच होतील, असं पंजप्यारे साहिबानने म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.