पुण्यातील SIMC शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक

पुण्यातील सुप्रसिद्ध 'सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन' या शिक्षण संस्थेची वेबसाईट काही अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हॅक केलीय. 'डॉन २' असं या दहशतवादी गटाचं नाव हॅक केलेल्या वेबसाईटवर देण्यात आले आहे. 

Updated: Jan 25, 2016, 09:27 AM IST
पुण्यातील SIMC शिक्षण संस्थेची वेबसाईट हॅक title=

पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध 'सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अॅण्ड कम्युनिकेशन' या शिक्षण संस्थेची वेबसाईट काही अज्ञात सायबर हल्लेखोरांनी हॅक केलीय. 'डॉन २' असं या दहशतवादी गटाचं नाव हॅक केलेल्या वेबसाईटवर देण्यात आले आहे. 

हे हल्लेखोर पाकिस्तानी अथवा ISIS या दहशतवादी संघटनेचे असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

वेबसाईट उघडल्यावर "ही केवळ एका युद्धाची सुरूवात आहे. यापुढे जगभरात आमचे राज्य प्रस्थापित होणार आहे" अशा आशयाचा एक संदेश अरबी भाषेत येत आहे.

सायबर हल्ले हे दहशतवादी रणनितीचा एक भाग आहे. जगभरात असे हल्ले होत असतात. २०१२ मध्येही एका पाकिस्तानी गटाने 'भारताने काश्मिरवर ताबा मिळविल्याच्या कारणास्तव' ही वेबसाईट हॅक केली होती.