धक्कादायक प्रकार: अपघातानंतर बघ्यांनी मृतदेहावरील दागिने चोरले

सोलापूर ते अहमदनगर रस्त्यावर करमाळा इथं अपघात झाल्यानंतर माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Updated: Jul 6, 2015, 11:28 PM IST
धक्कादायक प्रकार: अपघातानंतर बघ्यांनी मृतदेहावरील दागिने चोरले title=

सोलापूर: सोलापूर ते अहमदनगर रस्त्यावर करमाळा इथं अपघात झाल्यानंतर माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

कर्नाटकचे धनाढ्य पाटील कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेवून पंढरपूरला निघाले होते. करमाळ्याजवळ त्यांच्या मोटारीची समोरून येणा-या अल्टोशी जोरदार धडक झाली. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

यावेळी जवळपासच्या लोकांनी मदत करण्याऐवजी मृतांच्या हातातल्या अंगठ्या, लॉकेट काढून घेण्यात धन्यता मानली. हा प्रकार तिथल्या एका नागरिकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय, याची प्रचिती हे पाहिल्यानंतर जाणवते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.