जमिनीच्या वादातून लोखंडी रॉडनं महिला आणि मुलाला मारहाण

जमिनीच्या वादातून एक महिला आणि तिच्या मुलाला शेजारच्यांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारल्याची घटना शिर्डीत घडलीय. ही घटना सी.सी.टिव्ही मध्ये कैद झालीये. 

Updated: Apr 27, 2017, 11:31 AM IST
जमिनीच्या वादातून लोखंडी रॉडनं महिला आणि मुलाला मारहाण title=

शिर्डी : जमिनीच्या वादातून एक महिला आणि तिच्या मुलाला शेजारच्यांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारल्याची घटना शिर्डीत घडलीय. ही घटना सी.सी.टिव्ही मध्ये कैद झालीये. 

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शिर्डी पोलिस आरोपींचा शोध घेतायत. गेल्या काही वर्षांपासून गरुड आणि डांगे हे दोन परिवार शिर्डीतील शिवाजीनगर परिसरात राहतात. 

शिर्डी कनकुरी या मार्गावर असलेल्या जमीनीबाबत या दोन कुटुंबाचा जमिनी वरून वाद सुरु आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान चार दिवसा पूर्वी जमीनीच्या वादाची बातमी एका वर्तमानपत्रात आल्याचा राग येऊन डांगे आणि त्यांच्या मुलाने गरुड कुटुंबाला मारहाण केली.
 
पुनम गरुड आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून बबन डांगे आणि त्यांचा मुलागा फरार झालाय....पुनम गरुड यांना डांगे यांनी रोडनी केलेल्या मारहाणी मुळे चेह-याला मोठी दुखापत झाली असून त्यांना साईबाबा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.