सोनिया गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह कॉंग्रेसची केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंडळी आज नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत. 

Updated: Jul 14, 2016, 07:57 AM IST
सोनिया गांधींसह काँग्रेसचे दिग्गज नेते आज नांदेडमध्ये title=

नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह कॉंग्रेसची केंद्रीय आणि राज्यातील दिग्गज मंडळी आज नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत. 

माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त 14 जुलै रोजी चव्हाणांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण तसंच स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार आहे. 

नांदेड शहरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाणांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेनं या पुतळ्याची आणि संग्राहलयाची निर्मिती केलीये. या कार्यक्रमानंतर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. 

सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासारखी मंडळी या जाहीर सभेत हजेरी लावणार असल्याने ही नेतेमंडळी काय बोलणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

14 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रमाची नियोजित वेळ आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आलीये.