यवतमाळ आणि वाशिममध्ये मराठा मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशीम येथे मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. मोठ्या संख्येने मराठा बांधव वाशीम येथील कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावर एकत्रित झाले होते. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यवतमाळ वाशीमच्या खासदार भावना गवळी सुद्धा या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावरून शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौकहून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Updated: Sep 25, 2016, 03:53 PM IST
यवतमाळ आणि वाशिममध्ये मराठा मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद title=

मुंबई : वाशीम येथे मराठा मोर्चाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालाय. मोठ्या संख्येने मराठा बांधव वाशीम येथील कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावर एकत्रित झाले होते. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यवतमाळ वाशीमच्या खासदार भावना गवळी सुद्धा या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा कृषी उत्पन्न समितीच्या मैदानावरून शिवाजी चौक, पाटणी चौक, आंबेडकर चौकहून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. या वेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यवतमाळच्या मराठा बांधवांनी मोर्चात उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. मराठा कुणबी क्रांती मूक मोर्च्यात अभूतपूर्व गर्दी यावेळी पाहायला मिळाली. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होता. पोस्टल ग्राउंडवरून हा विराटा मोर्चा निघाला. यावेळी कोपर्डी येथील पीडितेसह उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मोर्चात शेतक-यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडण्यात आले. शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पाऊले उचला, शेतक-यांना कर्जमाफी द्या अशा आशयाचे फलक मोर्चेक-यांनी हाती घेतले होते. या मोर्चानिमित्त शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच शहरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.