गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

 राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीये. पोलीस पायलट गाडी आणि कार यांच्यात धडक बसल्याने हा अपघात झालाय. 

Updated: May 7, 2016, 07:38 PM IST
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात title=

श्रीरामपूर : राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीये. पोलीस पायलट गाडी आणि कार यांच्यात धडक बसल्याने हा अपघात झालाय. 

श्रीरामपूर-नेवासा रोडवर ही घटना घडलीये. या अपघातात एक जण ठार तर ८ जण जखमी झालेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

तसेच जखमींमध्ये तीन पोलिसांचाही समावेश आहे.