‘१० बाय १०’नं दिली मंजिरीला नवी ओळख!

पोलियो झालेली मुलं कायमचं अपंगत्व आल्यानं खचून जातात. मात्र आपल्या अपंगत्वाच्या दु:खाला बाजूला सारून मंजिरी भोयर हिनं स्वत:च्या जीवनावरच कविता केल्या आहेत. मंजिरीनं कवितेला आपलं जग बनवून टाकलंय.. तिचा ‘१० बाय १०’ हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होतोय.

Updated: Aug 11, 2014, 07:39 AM IST
‘१० बाय १०’नं दिली मंजिरीला नवी ओळख! title=

हिंगणघाट, वर्धा: पोलियो झालेली मुलं कायमचं अपंगत्व आल्यानं खचून जातात. मात्र आपल्या अपंगत्वाच्या दु:खाला बाजूला सारून मंजिरी भोयर हिनं स्वत:च्या जीवनावरच कविता केल्या आहेत. मंजिरीनं कवितेला आपलं जग बनवून टाकलंय.. तिचा ‘१० बाय १०’ हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होतोय.

लहानपणीच पोलिओच्या आजारानं कायमचं अपंगत्व आलं. त्यामुळं आतापर्यंतचे जीवन तिनं घरातल्या दहा बाय दहाच्या खोलीत घालवलं. मात्र याच ‘दहा बाय दहा’च्या खोलीनं तिला तिचं दुखः विसरायला लावलं आणि आज मंजिरी भोयर जगापुढे आलीये एक कवियत्री म्हणून... हातापायानं अधू असल्यानं तिला कुठंही जाता येत नाही. 

अशात अपंगत्वानं जायबंदी झालेल्या मंजिरीला आधार मिळाला तो शब्दांचा. विशेष म्हणजे अक्षरओळख होण्यासाठी तिला कधीही शाळेत जाता आलं नाही. पण आजीच्या वयाच्या सर्व महिलांमध्ये राहून तिच्यावर मराठी, संस्कृतचे श्लोक इत्यादींचे संस्कार झाले. तिची अक्षरओळख झाली आणि मग काय मंजिरीनं स्वत:चं आयुष्य कवितांमध्ये उतरवायला सुरूवात केली. दु:खाचे असो वा सुखाचे सारे क्षण ती कवितून मांडू लागली. गेल्या १५ वर्षांपासून मंजिरी कविता करतीये. तिच्या निवडक 80 कवितांचा काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होतोय. 

सुरुवातीला ‘10 बाय 10’च्या खोलीत आपली मुलगी काय करते हे तिच्या आईवडलांना कळतही नव्हतं. मात्र मंजिरीच्या कविता वाचल्यानंतर मुलीच्या अपंगत्वानं खचलेल्या तिच्या आईवडलांनाही हिंमत आलीये. 

अपंगत्वावर शब्दांनी मात करणारी मंजिरी समाजातील खचलेल्यांसाठी प्रेरणेचं आणि इच्छाशक्तीचं भांडार आहे. तिच्या कविता सर्वांनाच जगण्याची एक नवी दिशा दाखवतील हे नक्कीच...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.