लहान विद्यार्थ्यांनी घालून दिला मोठा आदर्श

दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना राज्याला करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. आणि हाच आदर्श नाशिकच्या चिमुरड्यांनी घालून दिलाय. 

Updated: Apr 4, 2016, 09:24 PM IST
लहान विद्यार्थ्यांनी घालून दिला मोठा आदर्श title=

नाशिक : दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना राज्याला करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. आणि हाच आदर्श नाशिकच्या चिमुरड्यांनी घालून दिलाय. 

झाडं आणि पक्षांची तहान भागवण्याचा या चिमरड्यांचा प्रयत्न आहे. शाळा सुटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वॉटर बॅगमध्ये उरलेलं पाणी फेकून देण्याऐवजी पिंपात जमा केलं जातं. त्यानंतर ते पाणी झाडांना तसेच पक्षांना पिण्यासाठी ठेवलं जातं. दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोवळ्या वयातच नाशिकच्या अभिनव बाल विकास विद्यामंदिरचे विद्यार्थ्यी पाणी बचतीचे धडे गिरवत आहेत.

शाळेच्या आवारातील  प्रत्येक झाडाच्या मुळाशी मातीची छोटी मडकी ठेवण्यात आली असून शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी वॉंटर बॅगमध्ये उरलेलं पाणी टाकतात. तसेच पक्षांसाठी झाडावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून दिवसाकाठी सरसरी १५ हजार लीटर पाण्याची बचत होते. थेंब थेंब तळे साचे या उक्ती प्रमाणे आज पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून पाणी बचतीसाठी त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. नाशिकच्या अभिनव बाल विकास विद्यामंदिरच्या विद्यार्थींनी सुरु केलेला प्रयत्न निश्चितच कौतूकास्पद आहे.