व्हॉटस अॅपवर आधी स्वत:ला श्रद्धांजली, मग आत्महत्या

व्हॉटस अॅपवर आपण आपले आनंदी क्षण मांडत असतो, आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा क्षणही आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना फोटोच्या रूपात पाठवत असतो, यात लग्न, साखरपुडा हे क्षण तर अत्यंत महत्वाचे असतात.

Updated: Nov 27, 2014, 09:07 AM IST
व्हॉटस अॅपवर आधी स्वत:ला श्रद्धांजली, मग आत्महत्या title=

सांगली : व्हॉटस अॅपवर आपण आपले आनंदी क्षण मांडत असतो, आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा क्षणही आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना फोटोच्या रूपात पाठवत असतो, यात लग्न, साखरपुडा हे क्षण तर अत्यंत महत्वाचे असतात.

मित्रांशी मजा-मस्ती गंमत जम्मत तर सुरूच असते, मात्र एखाद्याने आपल्या नावासमोर कैलासवासी भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणून त्याचाच फोटो टाकला तर तीही आपल्याला मित्राने केलेली गंमत वाटेल.

सांगली जिल्ह्यातील वाळवा गावातही असाच प्रकार घडला, २२ वर्षाच्या महादेव कुंभारने आपल्या फोटोवर कै. महादेव कुंभार, भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहून मित्रांना व्हॉटस अॅपवर फोटो पोस्ट केला.

एवढंच नाही तर सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे  महादेवने यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. 

गावोगाव भटकून मोलमजुरी करत पोटाची खळगी भरणाऱ्या कुंभार कुटुंबात वाढलेला महादेव कारखान्यात कंत्राटी काम करून महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. 

महादेवने रविवारी व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतचे छायाचित्र टाकून त्याखाली 'कै. महादेव कुंभार यांना भावपूर्ण श्रद्धांजली' असा मजकूर टाकून आपल्या वर्तुळातील मित्रांना मोबाइलवर पाठवला. महादेवच्या मित्रांनी हा संदेश तितक्याशा गांभीर्याने घेतला नाही. 

सोमवारी आई-वडील कामाला गेल्यानंतर महादेवने गळफास लावून घेत आत्महत्या केली. महादेवच्या मृत्यूची बातमी ऐकून मित्रांना धक्काच बसला. महादेवच्या आत्महत्येचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.