बीडमध्ये सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना 'दे धक्का'

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 20, 2017, 08:41 AM IST
बीडमध्ये सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंना 'दे धक्का'

बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ५  सदस्यांसह एकूण राष्ट्रवादीच्या ७  सदस्यांना सोबत घेऊन भाजपला जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय धस यांनी घेतला आहे. 

बीडमध्ये धनंजय मुंडेंना  सुरेश धस यांनी मोठा धक्का दिल्याने, पंकजा मुंडेंच्या गटाची मोठी सरशी होणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २६ तर भाजपचे २० सदस्य आहे. आता सुरेश धस यांच्या गटानं भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने,  जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.