सुशीलकुमार शिंदे यांना मित्राची आठवण येत आहे

लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे ही शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरले होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2017, 11:21 AM IST
सुशीलकुमार शिंदे यांना मित्राची आठवण येत आहे title=

लातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे ही शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरले होते. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांसाठी त्यांनी लातूर शहरात विविध प्रभागात सभा घेतल्या. दो हंसो का जोडा असं ज्या जोडीला संबोधिलं जायचं ती जोडी म्हणजे लातूरचे विलासराव देशमुख आणि सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे. 

मात्र आज लातूरच्या सभेला येताना विलासराव देशमुख यांची खूप आठवण येत असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं. माझ्या जिवलग मित्राची खूप आठवण येत असल्याचं सांगत ते भावूकही झाले होते. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. 

भाजपच्या वेड्या-वाकड्या प्रचाराला बळी न पडता काँग्रेसच्या पडत्या काळात लातूरकर काँग्रेसची साथ सोडणार नाहीत अशी भावनिक हाक त्यांनी यावेळी मतदारांना घातली. काँग्रेसचा हा नाजूक काळ असला तरी काँग्रेस लेची-पेची नसल्याचे दाखले यावेळी सुशिकलुकमार शिंदे यांनी दिले. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख आणि युवा नेते विश्वजित कदम यांची उपस्थिती होती.