स्वाईन फ्लूचा धोका वाढला, आरोग्यमंत्री राजीनामा द्या - विखे पाटलांची मागणी

अवकाळी पावसामुळं स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यामुळं राज्यातल्या डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यात. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत आदेश दिलेत. 

Updated: Mar 1, 2015, 11:25 PM IST
स्वाईन फ्लूचा धोका वाढला, आरोग्यमंत्री राजीनामा द्या - विखे पाटलांची मागणी title=

पुणे: अवकाळी पावसामुळं स्वाईन फ्लूचा धोका वाढल्यामुळं राज्यातल्या डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्यात. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबत आदेश दिलेत. 

राज्यात आतापर्यंत १४३ जणांचा स्वाईन फ्लूनं बळी घेतलाय. अवकाळी पाऊस आणि दमट हवा स्वाईन फ्लूचा विषाणू अधिक फोफावण्याची भीती वाढलीये. परिणामी राज्यात या आजाराचा मोठा धोका असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी मान्य केलं असून खबरदारीचे उपाय योजण्यात आल्याचं म्हटलंय. 

जळगाव- तर दुसरीकडे राज्यभरात कालपासून अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलीय. 

मुंबई: दरम्यान, राज्यात स्वाईन फ्लू  बाबात राज्य सरकार उदासीन असल्यानं राज्याच्या आरोग्य मंत्र्यानी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. राज्य सरकार सर्वच नैसर्गिक आपत्ती हाताळण्यात अपयशी ठरत आहे, तसंच अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर राज्य सरकार फारशी मदत करेल, असं दिसत नाही. मात्र सरकारनं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, असं पाटील म्हणाले. 

आणखी दोन दिवस पावसाचं वातावरण

मुंबई: पश्चिम  किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा झाल्यानं ढगाळ वातावरण आणि पाऊस  पडत असल्याचं वेधशाळेनं स्पष्ट केलंय. येत्या दोन दिवसांत असंच वातावरण  राहील आणि राज्यातील काही भागात  पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ पी. अजयकुमार  यांनी ही माहिती दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.