नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने केला रेप

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या नात्याला काळीमा फासणारी घटना डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरात घडलीय.

Updated: Jul 30, 2015, 09:59 PM IST
नापास करण्याची भीती दाखवून शिक्षकाने केला रेप title=

डोंबिवली : विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातल्या नात्याला काळीमा फासणारी घटना डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरात घडलीय.

खासगी शिकवणीसाठी येणा-या विद्यार्थिनीला नापास करण्याची भिती घालून गेल्या महिनाभरापासून संदीप महाले हा शिक्षक बलात्कार करत होता. डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा फुले रोडवरील गरीबाचा पाडा इथे असलेल्या उमिया कॉम्प्लेक्स इथे राहणारा संदीप महाले खासगी शाळेत शिक्षक आहे.

विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी देऊन ते खासगी शिकवणीसाठी घरी बोलावत असे. त्याच परिसरातली एक विद्यार्थिनी त्याच्या घरी शिकवणीसाठी येत असे. ही विद्यार्थिनी त्याच्या धमक्यांना बळी पडली.

अखेर महिनाभर अत्याचार सहन केल्यावर विद्यार्थिनीने ही घटना नातेवाईकांकडे उघड केली. संदीप महालेला अटक करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.