ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 24 तास पाणीपुरवठा

महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला. रस्ते, पाणी, भुयारी गटार, विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 30, 2017, 08:20 PM IST
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 24 तास पाणीपुरवठा title=

ठाणे : महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज महासभेत सादर केला. रस्ते, पाणी, भुयारी गटार, विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.

व्हिजन प्लॅन विकास प्लॅन अंमलबजावणी, रस्ते विकास आणि वाहतूक सुधारणेवर भर, चौपाटी विकास, 24 तास पाणी पुरवठा, स्मार्ट मिटरिंग, घोडबंदर आणि दिवा परिसरात भुयारी गटार योजना, फेज चार विद्युतीकरणावर भर आदी बाबींच्या व्हीजन प्लॅनची आयुक्तांनी घोषणा केलीय. 

या अर्थसंकल्पात 52 कि.मी. लांबीच्या एकूण 109  रस्त्यांचं काम हाती घेण्याचा प्रस्ताव आहे. रस्ते व वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. 

कासारवडवली, कळवा, खिडकाळी आदी पोलीस स्टेशनच बांधकाम ही लवकर पूर्ण होणार आहे. शहरात चित्रीकरणासाठी अद्ययावत स्टुडिओ, कन्व्हेन्शन सेंटर, कम्युनिटी आणि मॅरेज हॉल उभारण्याचा मानस आयुक्तांनी जाहीर केला. 

शहराचं ब्रँडींग केलं जाणार आहे भिंती रंगवा अभियान मोठ्याप्रमाणात राबवलं जाणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी 8 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. तर  झोपडपट्टीला कचरामुक्त करण्यात येणार आहे.