ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरील रेल्वे वाहतूक ठप्प

ऐरोली येथे दुरुस्तीचे इंजिन रुळावरून घसरल्याने ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालेय. दरम्यान, प्रवाशांना त्याच तिकिटावर आणि पासवर कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Updated: Jun 18, 2015, 09:51 AM IST
ठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरील रेल्वे वाहतूक ठप्प title=

नवी मुंबई : ऐरोली येथे दुरुस्तीचे इंजिन रुळावरून घसरल्याने ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालेय. दरम्यान, प्रवाशांना त्याच तिकिटावर आणि पासवर कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

सकाळी कामावर निघालेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे - वाशी मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांकडे सध्या रेल्वे स्थानकांवर ताटकळत राहावे लागले. 

ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान पारसिक बोगद्याजवळ रेल्वेच्या दुरूस्ती इंजिन घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे समजत आहे. काल रात्रीपासून याठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली. त्यानंतर रेल्वे मार्गावरून हे दुरूस्ती वाहन हटविण्यात अपयश आल्यामुळे सकाळपासूनच ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

ही वाहतूक पूर्ववत होण्यास किमान तासभराचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने कुर्ला स्थानकावरून विशेष लोकल्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.