पुण्यात मार्क्सवादी पक्ष कार्यालयाची तोडफोड

पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाची काही तरुणांनी तोडफोड केली. याबाबत कम्युनिस्ट पक्षाने भाजपकडे बोट दाखविले आहे. भाजपला सत्तेचा माज आलाय, असा हल्लाबोल नेते भालचंद्र कांगो यांनी केलाय. कांगो याचा हल्ला भाजप नेते आमदार गिरीष बापट यांनी परतवून लावलाय. 

Updated: Sep 2, 2014, 05:16 PM IST
पुण्यात मार्क्सवादी पक्ष कार्यालयाची तोडफोड title=

पुणे : पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाची काही तरुणांनी तोडफोड केली. याबाबत कम्युनिस्ट पक्षाने आरएसएसकडे बोट दाखविले आहे. भाजपला सत्तेचा माज आलाय, असा हल्लाबोल नेते भालचंद्र कांगो यांनी केलाय. कांगो याचा हल्ला भाजप नेते आमदार गिरीष बापट यांनी परतवून लावलाय. 

नारायण पेठ भागात असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये आज ५ ते ६ अज्ञात तरुणांनी तोडफोड केली. कार्यालयातील लाकडी फर्निचर, काचेच्या वस्तू यांची तोडफोड केल्यावर संपूर्ण कार्यालयात तेल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेलेत.

या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दिवसा हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
तुम्ही केरळमध्ये आमच्या आरएसएसच्या कार्यकर्त्याला मारले. त्यामुळेच आम्ही इथे आलो आहोत, असे हल्लेखोरांपैकी एक जण म्हणाल्याचे कम्युनिस्ट पक्षाकडून सांगण्यात येत आहे. हिंदुत्त्ववादी संघटनांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कांगो यांनी भाजपकडे बोट दाखविले असून भाजपला सत्तेचा माज आलाय, असे म्हटले.

आम्ही कोणत्याही घटनेचे समर्थन करीत नाही. असे कृत्य आम्ही करणार नाही. जे आरोप करण्यात येत आहेत. ते बिनबुडाचे आहेत. या आरोपात तथ्य नाही. आम्ही लोकशाही देशात राहत आहोत, असे आमदार गिरीष बापट म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.