तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार

भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

Updated: Apr 4, 2015, 04:10 PM IST
तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते - भाजप खासदार title=

श्रीगोंदे : भाजपचे काही नेते, मंत्री आणि खासदार आपल्या सुपीक डोक्यातील विचार व्यक्त करुन नव्या वादाला तोंड फोडत आहेत. आता अहमदनगरमधील भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी अजब शोध लावला आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही चांगले पचन होते, असे त्यांचे म्हणणे आहे.

तंबाखू खाण्यामुळे कर्करोग होत नाहीच, मात्र पचनक्रिया चांगली राहते, धक्कादायक विधान दिलीप गांधी यांनी केले. यावर न थांबता आपण पूर्वीच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे शुक्रवारी पुन्हा स्पष्ट केले.

तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे दिलीप गांधी प्रमुख आहेत. या समितीच्या अहवालातील तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, या मतावर सर्व स्तरांतून टीका झाली. त्यानंतरही गांधी त्यावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले. 

अर्धवट माहितीवर टिप्पणी करणे चुकीचे आहे. काही समाजसेवक मात्र नसती उठाठेव करतात, अशी टीकाही गांधी यांनी केली. निव्वळ तंबाखू खाल्ल्यामुळे कर्करोग होतो, असा निष्कर्ष अजूनपर्यंत कोणीही, कोठेही काढलेला नाही. मी माझ्या यापूर्वीच्या बोलण्यावर अजूनही ठाम आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलालाही कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ तो मुलगाही तंबाखू खातो का? , असा प्रतिप्रश्न केला.

तंबाखू या व्यवसायावर देशातील दोन कोटी लोकांचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे याबाबतच्या दोन्ही बाजू समजून घेणे आवश्‍यक आहे, असे गांधी म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.