टॉयलेटला दिले ऋषी कपूरचे नाव

आपल्या ट्विटरवरच्या टिवटीवमुळे अनेकवेळा अभिनेता ऋषी कपूर वादात अडकतो. देशातील अनेक ठिकाणांना नेहरू-गांधी परिवाराचीच नावे आहेत, अशी टीका करत ऋषी कपूरने मध्यंतरी गांधी परिवाराविरोधात ट्विटवर शाब्दिक हल्ला केला होता.

Updated: May 23, 2016, 08:02 PM IST
टॉयलेटला दिले ऋषी कपूरचे नाव title=

सोलापूर : आपल्या ट्विटरवरच्या टिवटीवमुळे अनेकवेळा अभिनेता ऋषी कपूर वादात अडकतो. देशातील अनेक ठिकाणांना नेहरू-गांधी परिवाराचीच नावे आहेत, अशी टीका करत ऋषी कपूरने मध्यंतरी गांधी परिवाराविरोधात ट्विटवर शाब्दिक हल्ला केला होता.

कुठे दिलं टॉयलेटला नाव...
त्याच्याच विरोधात सोलापूर येथे युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील स्वच्छतागृहाला ऋषी कपूरचे नाव देण्यात आले असून त्यांच्या निषेधार्थ घोषणाही करण्यात आल्या. युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह अनेक कार्यकर्ते ऋषी कपूरचा निषेध करत होते. गांधी कुटुंबाविरोधात आरोप केल्याच्या निषेधार्थात स्वच्छतागृहाला कपूर यांचे नाव दिल्याचे करगुळे यांनी सांगितले.

काय केलं होतं ट्विट...
फक्त दिल्ली शहरातच ६४ ठिकाणांना गांधी कुटुंबावियांची नावे आहेत असे ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून छायाचित्रांसकट शेअर केले होते. वांद्रे-वरळी "सी लिंक सारख्या ठिकाणांना लता मंगेशकर किंवा जे. आर. डी. टाटा यांची नावे द्यावीत असे सांगत देशाला बापाचा माल समजू नये असे त्यांनी ट्विट केले होते.

गांधी परिवाराचा केला होता निषेध....
देशातील महत्त्वांच्या ठिकाणांना कॉंग्रेस सरकारच्या काळात गांधी परिवारातील सदस्यांची नावे दिल्याबद्दल कपूर यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत गांधी परिवाराचा ट्विटरवर निषेध केला होता.