वसई-विरार पालिकेतले टॉप ५ 'करोडपती' नगरसेवक!

वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या १०२ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता तर १० कोटींपेक्षा अधिक आहे. 

Updated: Jun 17, 2015, 08:41 PM IST
वसई-विरार पालिकेतले टॉप ५ 'करोडपती' नगरसेवक! title=

पालघर : वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या १०२ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता तर १० कोटींपेक्षा अधिक आहे. 

विशेष म्हणजे, हे सर्वच्या सर्व नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे आहेत. या टॉप फाइव्ह करोडपती नगरसेवकांवर एक नजर टाकूयात...

हे आहेत 'टॉप 5' श्रीमंत नगरसेवक...

  • प्रविणा हितेंद्र ठाकूर, बविआ - १५८ कोटींची मालमत्ता

  • पंकज भास्कर ठाकूर, बविआ - १२५ कोटींची मालमत्ता

  • पंकज नारायण चोरगे, बविआ - ३० कोटींची मालमत्ता

  • उमेश दत्तात्रय नाईक, बविआ - २५ कोटींची मालमत्ता

  • सुदेश प्रभाकर चौधरी, बविआ - १६ कोटींची मालमत्ता

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.