पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरचा दरवाजा महिलांसाठी बंद

त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आलेल्या महिलांची पुन्हा एकदा अडवणूक करण्यात आलीय. 

Updated: Apr 19, 2016, 09:32 AM IST
पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरचा दरवाजा महिलांसाठी बंद title=

नाशिक : त्र्यंबकेश्वर गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आलेल्या महिलांची पुन्हा एकदा अडवणूक करण्यात आलीय. 

मंदिराचा फक्त पूर्व दरवाजा सुरू करण्यात आला आणि त्यातूनही मोजक्याच लोकांना गर्भगृहात प्रवेश देण्यात आला. बाकी सर्व दरवाजे मात्र बंद होते.

यामुळे, दर्शनासाठी आलेल्या सर्वसामान्य भाविकांची मात्र चांगलीच गैरसोय झाली. 

पोलिसांनी मात्र या प्रकरणात हस्तक्षेपाला नकार दिला. कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तरच पोलिसांकडून हस्तक्षेप करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.