तृप्ती देसाईंच्या आंदोलनामागे नेमकं कोण ? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या. तृप्ती देसाईंच्या या आंदोलनानंतर त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Jan 28, 2016, 10:20 PM IST
तृप्ती देसाईंच्या आंदोलनामागे नेमकं कोण ? सोशल मीडियावर जोरदार चर्चा title=

मुंबई: शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या. तृप्ती देसाईंच्या या आंदोलनानंतर त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यातल्या एका फोटोमध्ये तृप्ती देसाई या खडकवासलामधून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

तर दुसऱ्या फोटोमध्ये काँग्रेसचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना हार घालतानाचा फोटोही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  

तृप्ती देसाई यांच्या फेसबूक अकाऊंटवरही हे फोटो टॅग करण्यात आले आहेत.  त्यामुळे शनी मंदिराच्या चौथऱ्याचं आंदोलन करण्यामागे काँग्रेस असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.