दहीहंडीः राज्यात दोघा गोविंदांनी प्राण गमावले

Last Updated: Monday, August 18, 2014 - 21:53
दहीहंडीः राज्यात दोघा गोविंदांनी प्राण गमावले

ठाणेः गोविंदा पथकात नाचत असताना चक्कर येऊन पडलेल्या एका गोविंदाचा ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. लालबागच्या साईसदन गोविंदा पथकातील राजेंद्र आंबेकर असे या गोविंदाचे नाव असून  त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर रत्नागिरीत दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाला. ननाटे येथील बबन उमासरे यांचा दहीहंडी फोडताना मृत्यू झाला. 

राजेंद्र आंबेकर ठाण्यातील एका दहिहंडीत नाचत होता. त्यावेळी त्याला चक्कर आली. चक्कर आल्यावर त्याला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, हार्ट अटॅक आल्याने त्याचा रुग्णालयाच मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबईतील दहिहंडी उत्सवात आतापर्यंत ४३ गोविंदा जखमी झाले आहेत. यातील २८ केईएम, सायन ७, नायर, ४, आणि इतर रुग्णालयांमध्ये एकूण ४३ गोविंदा जखमी झाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Monday, August 18, 2014 - 17:58
comments powered by Disqus