मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Updated: May 24, 2015, 04:23 PM IST
मुंबई-गोवा हायवेवर दोन भीषण अपघात, २ ठार, २२ जखमी title=

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला असून अपघातामुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या महारामर्गावरील वाहतूक पूर्ण पणे बंद करुन मुंबईकडे येणारी वाहतूक पाली-खोपोली मार्गे वळवण्यात आलीये. 

तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झालेत तर २२ जण जखमी झालेत. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय. 

इतर जखमींवर महाडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्यानं गाडी झाडावर आधळून हा अपघात झालाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.