'उद्धव-राज भेट कौटुंबिकच'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी मातोश्रीवर झालेली भेट ही कौटुंबिक स्तरावर असल्याचं, शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Updated: Jul 30, 2016, 05:37 PM IST
'उद्धव-राज भेट कौटुंबिकच' title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी मातोश्रीवर झालेली भेट ही कौटुंबिक स्तरावर असल्याचं, शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. ही भेट राजकीय असल्याचे संकेत मनसेकडून दिले गेले होते. 

महापालिका निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांची 'मन की बात' लवकरच समोर येईल असं सूचक विधान, संजय राऊत यांनी केलं आहे. तर मोठ्या विजयासाठी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.