'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'

काहीवर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेनं रक्तदान शिबीर आयोजीत केलं होतं. 

Updated: Jan 25, 2016, 07:23 PM IST
'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला' title=

धुळे: काहीवर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेनं रक्तदान शिबीर आयोजीत केलं होतं. या शिबिरात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनही रक्तदान केलं होतं. उद्धव ठाकरेंचं हे रक्त मालेगावातील एका मुस्लिम महिलेला दिलं गेलं, असा दावा सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केला आहे. दादा भुसेंच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उद्धव ठाकरेंचं रक्त मालेगावमध्ये कसं आलं, आणि ते कोणाला दिलं गेलं, याबाबत मात्र कोणतीही माहिती दादा भुसे यांनी दिली नाही.