आमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी- उद्धव ठाकरे

विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातूनच या दोन पक्षांतल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं. 

Updated: Oct 11, 2015, 11:08 PM IST
आमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी- उद्धव ठाकरे title=

बीड: विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातूनच या दोन पक्षांतल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं. 

आणखी वाचा - उद्धव ठाकरेच्या अनुपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध योजनांचं भूमिपूजन

बीड जिल्ह्यातल्या १००० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये वाटप करण्यात आला. आम्ही सत्तेत आहोत. मात्र आमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी आहे. त्यामुळेच बीडच्या शेतकऱ्यांना आधार द्याला आलो, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना म्हणाले.  

योगा योगानं आज बीडमध्ये पाऊसही झाला. त्यामुळे येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल अशी आशा शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त केली. यावेळी राज्यात शिवसेनेचे मंत्री असणारे सुभाष देसाई, रामदास कदम, विजय शिवतारे, रवींद्र वायकर, दादा भुसे उपस्थित होते. येत्या काळात शिवेसेना सामुदायिक लग्नसोहळे आयोजित करेल, असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 

आणखी वाचा - का रे दुरावा; मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे व्यासपीठावर नसतील?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.