नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Updated: Aug 8, 2016, 05:19 PM IST
नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला  title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. वर्षा बंगल्यावर ही भेट होणार आहेत. शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची कामं होत नसल्याचं उद्धव आणि शिवसेना प्रतोद यांच्या बैठकीत समोर आलं होतं. राज्य मंत्र्यांकडे अधिकार नसल्याची शिवसेनेची तक्रार आहे. 

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे. या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत काही मंत्री आणि आमदार असणार आहेत.