चड्डी-बनियन गँग: वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा

वसई-विरारमध्ये चड्डी-बनियन गँगचा धुमाकूळ सलग दुसऱ्या रात्रीही सुरू होता. विरारच्या यशवंतनगर भागात चोरट्यांनी दोन घरांवर दरोडा टाकून तब्बल ४० तोळे सोनं लुटलंय. वॉचमनचे हातपाय बांधून ठेवत त्यांनी ही चोरी केली.

Updated: Aug 3, 2015, 03:26 PM IST
चड्डी-बनियन गँग: वॉचमनचे हातपाय बांधून दोन घरांवर दरोडा title=

वसई-विरार: वसई-विरारमध्ये चड्डी-बनियन गँगचा धुमाकूळ सलग दुसऱ्या रात्रीही सुरू होता. विरारच्या यशवंतनगर भागात चोरट्यांनी दोन घरांवर दरोडा टाकून तब्बल ४० तोळे सोनं लुटलंय. वॉचमनचे हातपाय बांधून ठेवत त्यांनी ही चोरी केली.

तर यापूर्वी वसईतील पूर्व सेक्टर ८ मधील ट्रिनिटी गार्डन, विजन हाइट, इंदपुरम या तीन उच्चभ्रू इमारतींमध्ये वॉचमनचे हात पाय बांधून ३ घरात दरोडा टाकण्यात आला. तोंडाला मास्क, चड्डी-बनियान घालून ९ दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास हा दरोडा घातला.

दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.