उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एक जवान शहीद

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला महाराष्ट्रातला आणखी एक जवान शहीद झालाय. 

Updated: Sep 19, 2016, 05:06 PM IST
उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एक जवान शहीद title=

यवतमाळ : उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला महाराष्ट्रातला आणखी एक जवान शहीद झालाय. 

यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातील पुरड गावचे रहिवासी असेलेले विकास जनार्दन कुळमेथे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर आर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 

27 वर्षीय जवान विकास कुळमेथे यांचे पार्थिव आज संध्याकाळी पुरड येथे आणणार आहेत. त्यामुळं आज किंवा उद्या सकाळी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विकास यांचं दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे.