रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे

शिक्षणावर अधिक खर्च करायचा असेल तर रस्ते, धरण, शेतकरी यांचे पैसे कापावे लागतील, असं धक्कादायक विधान केलं आहे स्वतः राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...

Updated: Jun 7, 2015, 04:09 PM IST
 रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे  title=

चिखली : शिक्षणावर अधिक खर्च करायचा असेल तर रस्ते, धरण, शेतकरी यांचे पैसे कापावे लागतील, असं धक्कादायक विधान केलं आहे स्वतः राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...

दरवर्षी आपण शिक्षणावर ४४ हजार कोटी रुपये खर्च करतो. म्हणजेच १०० रुपयांपैकी ४४ रुपये आपण शिक्षणावर खर्च करतो. जर यापेक्षाही अधिक खर्च शिक्षणावर करायचा असेल तर शेतकऱ्यांचे पैसे कापावे लागतील, धरणांसाठीचे पैसे कमी करावे लागतील, रस्त्यांसाठी खर्च होणारे पैसे रोखावे लागतील, असं विधान विनोद तावडे यांनी केलं. 

मात्र शेतकऱ्यांना रस्ते हवेत पण टोल नको, धरण पाहिजे पण महागाई नको, असं अजब वक्तव्य तावडे यांनी केलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथे आयोजित शिक्षक पालक मेळाव्यात, शिक्षक आणि पालकांशी सवांद साधताना त्यांनी अशाप्रकारचे विचार मांडल्यानं, उपस्थित सारेच अवाक झाले. 

दरम्यान तावडे यांच्या या विधानाचा काँग्रेसनं तीव्र शब्दांत निषेध केलाय. विरोधात असताना वारेमाप आश्वासन देणाऱ्या विद्यमान भाजप सरकारचा, राज्याच्या प्रश्नांबाबत अभ्यासच नसल्याचं यातून दिसत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.