VIDEO : मराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ

सध्या, सोशल वेबसाईटवर काही मराठी तरुणांचा रशियात शूट झालेला एक व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय. 

Updated: Jul 24, 2015, 05:37 PM IST
VIDEO : मराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ title=

मुंबई : सध्या, सोशल वेबसाईटवर काही मराठी तरुणांचा रशियात शूट झालेला एक व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय. 

या व्हिडिओत एका हॉटेलमध्ये हे तरुण आग्री गाण्यावर थिरकताना दिसतायत. मात्र, हे हॉटेल मुंबई-पुण्यातलं नसून ते आहे रशियातलं... फॉरेनच्या ललनांसोबत खास आग्री गाण्यांवर थिरकण्यासाठी या तरुणांनी थेट उत्तर धृवच गाठलं... 

हे सर्व तरुण आहेत रायगड जिल्ह्यातल्या घोट गावातले. पनवेल जवळ असलेल्या या गावातल्या दौलतजाद्यांनी थेट रशियात जाऊन मजा-मस्ती केली. 

रायगड जिल्ह्यातल्या पनवेल जवळच्या घोट गावामधल्या तरुणांचा हा व्हिडिओ आहे. रशियातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला. तिथे रशियन नर्तकींची एक खासगी मैफल भरवली. आणि आगरी गाण्यांवर आगरी स्टाईलनं स्वतः मनमुराद नाच केला, सोबतच रशियन नर्तकींनाही आगरी ठेक्यावर ताल धरायला लावत त्यांच्यावर दौलतजादाही केली.

विशेष म्हणजे या तरुणांनीच हा व्हिडिओ सोशल वेबसाईटवरही अपलोड केला. सध्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.