नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. 

Updated: Nov 3, 2015, 01:47 PM IST
नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू title=

औरंगाबाद/संगमनेर: अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. 

आणखी वाचा - मराठवाड्याला नगर, नाशिक जिह्यातून पाणी मिळण्यास सुरूवात

मुळा ते पैठण हे अंतर १०१ किलोमीटर आहे. पाणी पोहोचण्यासाठी २२ तासांचा कालावधी लागतो. ओझर वेअर ते जायकवाडी हे १२९ किलोमीटरचं २४ तासांमध्ये कापलं जाईल. भंडारदरा ते जायकवाडी २०९ किमी अतंर पार करण्यासाठी ४० तासांचा अवधी लागेल. तर नाशिक विभागातलं पाणी १५४ किलोमीटरचा प्रवास करणार असल्यानं हे पाणी पोहोचायला ४० तास लागतील.

संगमनेर शहरासह आज तालुका बंद

मुळा धरणातून प्रवरा नदीपात्रात जायकवाडी धरणासाठी दोन हजार क्युसेक्सनं सोडलेलं पाणी संगमनेर शहरापर्यंत पोहचलं आहे. धरणातलं पाणी आंदोलकांकडून रोखलं जाऊ नये, यासाठी धरणावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यासाठी पाणी सोडल्याच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरासह तालुक्यातही बंद पाळला जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

आणखी वाचा - पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.