तुरुंगात असताना याकूब मेमनने काय केले?

नागपूर तुरुंगात असताना याकूब मेमनने आपला सगळा वेळ शिक्षण घेण्यात घालवला. त्याने या काळात दोन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री प्राप्त केल्या. एक रिपोर्ट.

Updated: Jul 30, 2015, 10:47 AM IST
तुरुंगात असताना याकूब मेमनने काय केले? title=

अखिलेश हळवे / राकेश त्रिवेदी, नागपूर : नागपूर तुरुंगात असताना याकूब मेमनने आपला सगळा वेळ शिक्षण घेण्यात घालवला. त्याने या काळात दोन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री प्राप्त केल्या. एक रिपोर्ट.

याकूब अब्दुल रज्जाक मेमन. वय वर्ष ५३. पेशा चार्टर्ड अकाऊंटंट. २००७मध्ये याकूब मेमनला मुंबईच्या अर्थररोड तुरुंगातून नागपूरमध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे तुरुंगात कोणतंच काम त्याला देण्यात आलं नव्हतं. त्याचाकडं बराच फावला वेळ  होता. त्यामुळे याकूबने शिक्षणात स्वत:ला गुंतवूण ठेवलं.

गेल्या चार वर्षांत याकूबने पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दोन वेगवेगळ्या डिग्री प्राप्त केल्या. २०१३मध्ये त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून इंग्रजीत पोस्ट ग्राज्युएशनची डिग्री मिळवली. तर चालू वर्षात याकूबने मुक्त विद्यापीठातून प़ॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्राज्युएशन पूर्ण केलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात याकूबला त्याचे साथिदार कैदी त्याला सर म्हणत. कारण इतर कैद्यांच्या तुलनेत तो सर्वात जास्त शिक्षण घेतलेला कैदी असल्यामुळे इतर कैदी त्याला सर म्हणत. तसेच तो इतरांना शिक्षणात मदत करत असे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळल्यानंतर याकूब खूप नाराज होता. त्याचं मानसिक संतुलन ढळल. त्यासाठी त्याच्यावर इलाज केला गेला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याकूबला मानसिक रोग झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आला होता. त्याला सतत कशाची तरी भीती वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तो स्वत:शी बोलत असे. तर कधी तासनं तास शांत बसून रहात असे.

याकूब ५३ वर्षांचा झाला असून तुरुंग प्रशासनाकडं असलेल्या त्याच्या कागदपत्रावर ३० जुलै ही त्याची जन्म तारीख आहे. त्याच्या जन्मदिनी त्याला फाशी दिली गेली. पोलिसांनी अटक केलेला याकूब आणि आताचा याकूब यात बराच फरक पडला होता. तो आता म्हातारा झाला. त्याचे केस पांढरे झाले होते. त्याचं वजन साठ किलो होते, असे सूत्रांनी सांगितलं. नुकतेच याकूबची पत्नी आणि मुलीने त्याची तुरुंगात जावून भेट घेतली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.