राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!

एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे. 

Updated: Jul 10, 2014, 08:24 PM IST
राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी! title=

धुळे: एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे. 

राज्यातलं सध्याचं सर्वात सुखद चित्र आत्ता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहत आहात. तापी नदी पुरेपुर भरलीय. देशातील सर्वाधिक काळ पाणी साठवण्याची क्षमता असलेली तापी नदी ऐन दुष्काळात उत्तर महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरते. ही नदी जुलै महिन्यातही दुथडी भरलीय. या नदीवर हथनूर धरणाशिवाय सुलवाडे, सारंगखेडा, प्रकाश बॅरेजमध्ये प्रचंड पाण्याचं भांडार साठवलंय. तंत्रज्ञानाची आणि नैसर्गिक स्थितीची सुरेश सांगड इथं घातलीय. 

तापी नदीचं पात्र खोल असल्यामुळं इथं खूप पाणी साठवलं जातं. पण त्याचा पुरेपूर वापर मात्र होत नाही. वर्षभर पुरेल एवढं पाणी नदीच्या बॅरेजेसमध्ये साठवलं जातं. मात्र पाऊस आल्य़ावर हे पाणी सोडून द्यावं लागतं. हे आयतं पाणी गुजरातच्या उकाई धरणात जाऊन विसावतं.

एकीकडे राज्यात धरणात पाणी नाही... तर तापी धरणातलं मुबलक पाणी असून त्याचं निय़ोजन नाही अशी स्थिती आहे. पाण्याचं योग्य नियोजन केलं तर हेच मुबलक पाणी दुष्काळी भागांसाठी वरदान ठरू शकतं.. तसं झालं तर दुष्काळी निधींची तरतूदच करण्याची गरज लागणार नाही असा विश्वास जलतज्ज्ञांना आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.