पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण?

भाजपच्या जुन्या नेत्याची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महापौरपदी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 7, 2017, 08:23 PM IST
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण? title=

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड झाली आहे. भाजपच्या जुन्या नेत्याची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महापौरपदी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलीय. 

शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यात या पदावरून रस्सीखेच सुरु आहे.ज्या गटाचा महापौर होणार त्याच नियंत्रण महापालिकेवर राहणार असल्याने राजकारण चांगलंच तापलय.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपचा महापौर कोण होणार याकडं संपूर्ण शहराचे लक्ष लागलंय. भाजपचा जुना कार्यकर्ता होणार की शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या गटाचा होणार की आमदार महेश लांडगे यांच्या गटाचा होणार की तिसरंच नाव समोर येणार याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. 

एकीकडं ही चर्चा रंगली असताना गटनेतेपदी एकनाथ पवार या जुन्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्याची निवड झाल्याने महापौरपदाच्या शर्यतीतून निष्ठावान कार्यकर्त्याची निवड अशक्य असल्याची चर्चा आहे. मुळात कोणत्याच गटाचे नसलेले आणि जुने निष्ठावान असलेले एकनाथ पवार हेच महापौरपदाच्या शर्यतीत होते, त्यामुळं तर या चर्चेला अधिकच बळ मिळतंय. स्वतः पवार यांनी मात्र आपण महापौर पदाच्या शर्यतीत नव्हतो असं सांगितलं आहे.

आता महापौरपदाच्या शर्यतीत जुन्या भाजपमधले नामदेव ढाके शर्यतीत आहे. त्यांनी ही जबाबदारी दिली तर स्वीकारेन असं सांगितलंय आणि नाही झालो तर पक्षाने सर्वसमावेशक चेहरा द्यावा असं म्हटलंय...! 

आता लक्ष्मण जगताप यांच्या गटातून शत्रूघन उर्फ बापू काटे, शीतल शिंदे तर लांडगे गटाकडून संतोष लोंढे, नितीन काळजे आणि राहुल जाधव यांची नावे चर्चेत आहेत...सगळ्यांनी आपली निवड व्हावी यासाठी देव पाण्यात ठेवलेत. आता कोणाची निवड होणार हे सांगता येत नसलं तरी ज्या गटाचा महापौर त्याचा महापालिकेवर वरचष्मा हे उघड गुपीत आहे.