'मग मतदार याद्या डिजीटल का नाहीत?'

डिजीटलच्या घोषणा करता मात्र मतदार याद्या का डिजिटल होऊ शकत नाही

Updated: Mar 6, 2017, 10:45 PM IST
'मग मतदार याद्या डिजीटल का नाहीत?' title=

ठाणे : डिजीटलच्या घोषणा करता मात्र मतदार याद्या का डिजिटल होऊ शकत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ झाले आहेत, त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. हा लोकशाहीचा अपमान आहे, अशी टीकाही आव्हाड यांनी केली आहे.

महापालिका निवडणुकांवेळी इव्हीएम मशीनमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप होत आहे. पण पराभव हा पराभव असतो, तो स्वीकारला पाहिजे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ठाण्यामध्ये आम्हाला ४० पर्यंत अपेक्षा होती मात्र ते झालं नाही म्हणून आमचं टार्गेट पूर्ण होऊ शकलं नाही, अशी कबुली आव्हाड यांनी दिली आहे.