हिवाळी अधिवेशन : चहापानाला ना मुख्यमंत्री ना विरोधक

राज्यात सध्या विरोधी पक्षचं अस्तित्वात नसल्याने एक विचित्र परिस्थिती निर्माण झालली आहे.

Updated: Dec 7, 2014, 11:47 PM IST
हिवाळी अधिवेशन : चहापानाला ना मुख्यमंत्री ना विरोधक title=

नागपूर : राज्यात सध्या विरोधी पक्षचं अस्तित्वात नसल्याने एक विचित्र परिस्थिती निर्माण झालली आहे.

येत्या सोमवारपासून नागपूर इथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी रविवारी सरकारतर्फे विरोधी पक्षांना चहापानासाठी निमंत्रित केलं जातं. पण याआधी विरोधी पक्षात असलेली शिवसेना आता सरकारमध्ये सहभागी झाली आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभेला सध्या विरोधी पक्षनेताच नाही. त्यामुळे सरकारच्या चहापानाचे निमंत्रण कुणाला द्यायचे? असा पेच निर्माण झालाय. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेदपावर दावा सांगितलला आहे. सोमवारी याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत. त्यामुळे रविवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीपैकी प्रमुक विरोधी पक्ष म्हणून सरकार कुणाला चहापानाला निमंत्रित करणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, काँग्रेसने हिवाळी अधिवेशनाआधी सरकारने आयोजीत केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय. भाजप सेना सरकारच्या पहिल्याच पूर्णकालीन अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजीत केलेल्या चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्री स्वतःच उपस्थित राहणार नाहीत. ते नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने बहिष्काराचं अस्त्र उगारलंय.

अधिवेशनाच्या चहापानाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाराज झालंय. विरोधकांचा असा अपमान करणं चुकीचं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय. आत्तापासूनच सत्तेची हवा डोक्यात गेल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केलीय. अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.