लग्नाचे आमिष दाखवून घातला ६६ लाख रुपयांचा गंडा

एका घटस्फोटीत महिलेला एका वेबसाईटद्वारे लग्नाचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

Updated: Jan 11, 2016, 08:11 PM IST
लग्नाचे आमिष दाखवून घातला ६६ लाख रुपयांचा गंडा title=

मुंबई : एका घटस्फोटीत महिलेला एका वेबसाईटद्वारे लग्नाचे आमिष दाखवून ६६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात याविषयी मुख्य आरोपी यज्ञेष पांचाळ आणि अन्य १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर महिलेचा १९९७ साली घटस्फोट झाला असून तिने भविष्यातला आधार म्हणून पुनर्विवाहाचा निर्णय घेतला हो़ता.

यासंबधी तिने एका वेबसाईटवर नाव नोंदवले असता अहमदाबाद येथील यज्ञेशने तिला दूरध्वनीवर संपर्क साधला आणि लग्नाची मागणी घातली. 

यानंतर आपल्या मलेशियातील कंपनीसाठी गरज आहे असे सांगून त्याने सदर महिलेकडून तब्बल ६६ लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या खात्यात वेळोवेळी जमा करुन घेतली. पुढे त्याने तिच्याशी संपर्क तोडला तेव्हा हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आले.