लेखक शरद पवार औरंगाबादेत म्हणाले...

मी अनुभव लिहिले आणि पुरस्कार मिळाला,  खूप काही लिहायचं आहे. मात्र राजकारणातील माझे हितचिंतक मला आता तुम्ही हेच करा असं म्हणतील.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 24, 2017, 04:40 PM IST
लेखक शरद पवार औरंगाबादेत म्हणाले... title=

औरंगाबाद : मी अनुभव लिहिले आणि पुरस्कार मिळाला,  खूप काही लिहायचं आहे. मात्र राजकारणातील माझे हितचिंतक मला आता तुम्ही हेच करा असं म्हणतील, त्यामुळे मला माझ्या मर्यादा ठेवाव्या लागतील, अशी मिश्कील वक्तव्य शरद पवार यांनी औरंगाबादेत केलं. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण वाड्:मय पुरस्कार हा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रपर पुस्तकाला देण्यात आला.. तर नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार रंगभूमीवरील कार्यासाठी डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला.. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आप-आपल्या अनुभवांना उजाळा दिला.