कृपाशंकरांनी कशी कमावली 'माया'?

Last Updated: Thursday, February 23, 2012 - 12:31

www.24taas.com, मुंबई

 

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या चर्चा सुरु झाल्या आहेच. उत्तरप्रदेशातून आल्यानंतर एक कांदेबटाटा विक्रेता ते अब्जाधीश असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

 

कसा आहे  कृपाशंकर सिंह यांचा राजकीय प्रवास

 

कांदेबटाटा विक्रेता ते राजकारणी

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले कृपाशंकर सिंह १९७० साली मुंबईत आले. सुरुवातीला मुंबापुरीत आल्यानंतर त्यांनी कांदेबटाटे विक्रीचा धंदा सुरु केला. त्यानंतर एका खाजगी कंपनीत कृपांना नोकरी मिळाली. मुंबईत स्थिरावत असतानाच १९८८ साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तेव्हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आयोजक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

आमदार ते गृहराज्यमंत्री

मुंबई काँग्रेसच्या राजकारणात नाव कमावत असताना १९९४ साली त्यांनी विधानपरिषदेत एंट्री मारली. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली. १९९९ ते २००४ या कालावधीत महत्वाच्या अशा गृहराज्यमंत्रीपदाची माळ गळ्यात घालून घेण्यात ते यशस्वी ठरले. अन्न आणि औषध मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.

दिल्लीचा विश्वास, मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात

महाराष्ट्र आणि दिल्ली नेतृत्वाचा विश्वास जिंकण्यात कृपांनी यश मिळवलं. त्यामुळं २००६ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निमंत्रक म्हणून झारखंडमध्ये नियुक्ती करण्यात आली. तर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासारखं महत्वाचे पदही त्यांनी भूषवलं.  आमदार असताना प्रतिमहिना ४५ हजार कमावत असल्याचे कृपांनी दाखवलं होतं. मात्र त्याहून कितीतरी पटीने अधिक त्यांची बेहिशोबी संपत्ती असल्याचे आढळलं आहे.

 

 

 

First Published: Thursday, February 23, 2012 - 12:31
comments powered by Disqus