ठाण्यात महिला नगसेवक बेपत्ता

Last Updated: Saturday, March 3, 2012 - 18:04

www.24taas.com, ठाणे

 

ठाण्यात महापौरपदासाठी आवश्यक असलेला ६६ चा जादूई आकडा गाठण्यासाठी महायुती आणि आघाडीत जोरदार चुरस असताना भाजपच्या महिला नगरसेवक बेपत्ता असल्याने नेतेमंडळींची धावपळ उडाली आहे. बेपत्ता नगरसेविका राष्ट्रवादीच्या संपर्कात  असल्याचे बोलले जात असल्याने युतीची  राजकीय कोंडी झाली आहे.

 

 

ठाण्यात भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे  २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता आहेत.महापौरपदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेविका बेपत्ता झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. सुहासिनी लोखंडे या प्रभाग क्र-४८ मधील नगरसेविका आहेत. दरम्यान  ठाण्यातल्या भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांचं अपहरण केल्याचा आरोप ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले यांनी केला आहे. नगरसेविका लोखंडेच्यांच्यासोबत त्यांचे पती आणि मुलाचंही अपहरण केल्याचा आरोपही लेले यांनी केला आहे. या आरोपामुळे या प्रकणाची  गंभीरता वाढली आहे.

 

 

महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांना सध्या गुप्तस्थळी हलवण्यात आल आहे. मात्र लोखंडे या गटाबरोबर गेल्या नव्हत्या. भाजप नगरसेवकांच्या गटासोबत लोखंडे का गेल्या नाहीत याचा जाब विचारण्यासाठी काल रात्री भाजप कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले होते. सुहासिनी लोखंडे या  राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. सध्या ठाण्यात महापौरपदासाठी आवश्यक असलेला ६६ चा जादूई आकडा गाठण्यासाठी महायुती आणि आघाडीत जोरदार चुरस आहे. भाजप नगरसेविका अचानकपणे बेपत्ता होणं हा त्याचाच भाग असल्याची चर्चा आहे.

First Published: Saturday, March 3, 2012 - 18:04
comments powered by Disqus