बंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरेंचा आटापिटा

Last Updated: Friday, January 27, 2012 - 16:29

www.24taas.com, मुंबई 

 

पालिका निवडणुकीत उमेदवारांकडून  बंडखोरी होवू नये तसेच बंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरेंनी आटापिटा केल्याचे मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिसून आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरेंनी उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची आणि त्यांच्या घरच्यांची माफी मागून भावनिक आवाहन केले.

 

मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर सभागृहात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज इच्छुकांचा मेळावा झाला. त्यात राज ठाकरे इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी बंडखोरी टाळण्यासाठी राज ठाकरेंनी आटापिटा केल्याचे दिसून आले. यावेळी राज ठाकरेंनी भावनिक आवेग पाहून  काहीवेळ सभागृहात शांतता पसरली.

 

निवडणुकीसाठी अनेक जण इच्छूक आहेत. सर्व उमेदवारांची मी परीक्षा घेतली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये मनसेची प्रक्रिया उत्तम झाली आहे. सर्वांनी चांगली परीक्षा दिली आहे. उमेदवार चांगले असल्याने निवड कशी करायची हा मोठा पेच आहे, असे  राज ठाकरे यांनी सांगितले.

 

बाहेरच्याशी लढेल हो, पण आतील ही घालमेल कशी क्षमवू, असे सांगत इच्छुकांमधील उमेदवार निवडणे कठीण होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मी कोणावर अन्याय तर केला नाही, असं वाटून गेलं. त्यामुळे उमेदवारांना पुन्हा मी घरी बोलावलं. तुमच्यातील कोणाला उमेदवारी दिली नाही, तर तुमच्या घरच्यांना काय वाटेल हा प्रश्न सतावत होता आणि आजही आहे. माझ्या चपलेत तुम्ही पाय घातले तर तुम्हांला माझी स्थिती समजेल, अशी भावनिक साद घातली.

 

यानंतर त्यांनी परीक्षेतील गंमती जंमती सांगून भावनिक वातावरणावर विनोदाची चादर टाकली.  परंतु, ही चादर बंडखोरी टाळण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न दिसू आल्याचे राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे. त्यानंतर शेवटी त्यांनी मी बंडखोरीला घाबरत नाही, असा आपला ठाकरी बाणा दाखवला. परंतु तो आज राज ठाकरेंना शोभत नव्हता, हे मात्र स्पष्ट दिसून येत होते.

 

[jwplayer mediaid="36594"]

First Published: Friday, January 27, 2012 - 16:29
comments powered by Disqus