बाळासाहेब उतरणार पालिका रणसंग्रामात

Last Updated: Wednesday, January 18, 2012 - 23:59

www.24taas.com, मुंबई 

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेवर सेना-भाजपचा भगवा पुन्हा फडकविण्यासाठी आता या निवडणुकीच्या रणसंग्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांनी उडी घेतली आहे. खुद्द बाळासाहेब यांनी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुकंले आहे. त्यामुळे आता बाळासाहेब निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे.

 

गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, बाळासाहेब निवडणुकीत प्रचार करणार का? कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार का? या सगळ्या गोष्टींवर आज पडदा पडला आहे. बाळासाहेब उद्या मुंबईतील शाखाप्रमुख, पदाधिकारी यांची बैठक घेणार असल्याचे समजते, बाळासाहेब यांनी पुन्हा एकदा जोमाने निवडणुकीसाठी तयारी केल्याचे दिसते.

 

उद्या बांद्रा येथील एमआयजी क्लब किंवा दादर येथील शिवसेनाभवनात या साऱ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बाळासाहेब उद्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुका चांगल्याच रंगणार हे निश्चित.First Published: Wednesday, January 18, 2012 - 23:59


comments powered by Disqus