मुंबई मोनोरेलला भाजपचा 'रेड सिग्नल'

मुंबईतल्या मोनोरेलची होणारी चाचणी पुन्हा रद्द करण्यात आली आहे. ही चाचणी बुधवारी होणार होती, परंतु भाजपनं निवडणूक आयोगाकडं चाचणीविरोधात तक्रार केल्यानंतर मोनोरेलची होणारी चाचणी रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Feb 15, 2012, 10:13 AM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या मोनोरेलची होणारी चाचणी पुन्हा रद्द करण्यात आली आहे. ही चाचणी बुधवारी होणार होती, परंतु भाजपनं निवडणूक आयोगाकडं चाचणीविरोधात तक्रार केल्यानंतर मोनोरेलची होणारी चाचणी रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोनोरेलची अधिकृत चाचणी रद्द झाली असली तरी रात्री मोनोरेलची टेस्ट ड्राईव्ह घेण्यात आली. साडेचार किलोमीटरपर्यंत ही चाचणी घेतली जाणार होती. मुंबई महापालिकेसाठी १६ फेब्रूवारीला मतदान होतं असून मोनोरेलच्या चाचणीमुळं मतदारांवर फरक पडू शकतो. असा मुद्दा भाजपनं निवडणूक आयोगाकडं मांडला होता.

मुंबईतल्या मोनोरेलला मुहुर्त लगणं तसंही कठीणच झालेलं आहे. मोनोरेल प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. तसाच तो कायम वादाच्या भोवऱ्यातही अडकून पडला.  मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र मोनोरेलची चाचणी होत असताना त्यात राजकारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मोनोरेलचा प्रश्न उभा राहिला आहे.

[jwplayer mediaid="48123"]